Wednesday, 26 October 2016

"जरा माणूस होऊन पाहुया"



वानराच्या अस्तित्वातुन 'मनुष्य' जन्म हा लाभला...
जन्म हा फुकटात मिळालेला मनसोक्तपने उधळला..
ह्याच जन्मा कड़े वळुनि एकदा पाहुया...
"Gentleman" बनून भरपूर जगलो..
जरा "माणूस" होऊन पाहुया।


रात्रं दिवस ही स्पर्धा जीवघेणी..
ध्येयाचा कुठे अंश नाही..
जो तो आपल्या तोरयात् नाचतो..
वेळ जिंकन्या मागे..आयुष मात्र अल्पशे राही।
काळाच्या ह्या बंधनातून जरा मुक्तपने उडुया..
"Gentleman" बनून भरपूर जगलो..
जरा "माणूस" होऊन पाहुया।


पैशाचा हा मोह सारा , असे प्रसिद्धिची माया..
निरर्थक असलेल्या त्या संपति साठी.. अनमोल जन्म हा वाया।
पोटी असलेल्या ह्या भस्मयाला आता लगाम देऊया..
"Gentleman" बनून भरपूर जगलो..
जरा "माणूस" होऊन पाहुया।


नराधमांची ही वस्ति सारी.. शिकार झाली ती पाखरे..
जळुनि गेला तो निरागसपना हाती उरली राख रे।
ह्याच कोवळ्या जीवांमधे आपले बालपन शोधुया..
"Gentleman" बनून भरपूर जगलो..
जरा "माणूस" होऊन पाहुया।

जातीयतेचा तो असुर उठला,मेली ती नाती सारी..
समानतेच ताज मिरावनारा लग्न जुळताना मात्र जात विचारी।
तोडून दोरखंड सगळे, एकसमान राहुया..
"Gentleman" बनून भरपूर जगलो..
जरा "माणूस" होऊन पाहुया।


प्रभुत्व मिळवुनी सर्व क्षेत्रांचे, असे सर्वात अडानी..
जो तो जपे अहंकार आपला..जो तो इथे अभिमानी।
मनुसकीच्या ह्या धरणीला ,आपल्या उदंड प्रेमाने सिंचुया।
"Gentleman" बनून भरपूर जगलो..
जरा "माणूस" होऊन पाहुया।

1 comment: