दैनंदिनीच्या आळसाला मेहनतीची चपराक तु.. 💪🔥
रात्री उशिराने येणाऱ्या निद्रेला..सकाळच्या उजेडाचा धाक तु.. 🌅⏰
संघर्ष तू...धावपळ ही तू..मनाला आणि डोक्याला न बोलवता येणारा त्राण तु... 🏃♂️🧠
समाजात वावरताना..ताठ मानेला दिलेला अभिमान तु.. 🧍♂️✨
करून थकलो जरी कितीही तुझी चाकरी... 😓🔁
स्वप्नांना पंख देणारी..तूच लाख मोलाची नोकरी... ✨🕊️💼
तुझ्याच तर शोधात ...झिजवल्या होत्या टाचा .. 👣🔍
झोपलेल्या त्या आत्मविश्वासाला..तूच फोडली होतीस वाचा.. 🗣️💥
चालक त्या दुनिये समोर...तूच उभा राहायला शिकवलंस.. 🌍🧍♂️
यशाची परिभाषा सांगून..तूच तोऱ्यात मिरवलंस .. 🏆😌
तुझ्याच मुळे पडते बघ रोज ताटात भाजी न भाकरी... 🍽️🥗
स्वप्नांना पंख देणारी...तूच लाख मोलाची नोकरी.. ✨🕊️💼
गर्दीत घुसमटणारा तो श्वास.घामाने डबडबलेला शरीर घेऊन रोजच असे लोकल चा त्रास 🚆😤
तुझ्याच तर कृपेने बघ ...करितो आज वातानुकूलित ट्रेन ने आरामदायक प्रवास.. 🚄❄️😌
तू मिळण्याआधी तास न तास बघत असे बस ची वाट.. 🚌⌛
तुझ्या येण्याने बघ कसा मिरवतोय आज कॅब चा थाट... 🚖😎
राहायला डुप्लेक्स फ्लॅट न अंगावर आला ब्रँड... 🏠✨
तुझ्या आशीर्वादाने होतो बघ..समजात आण नातलगांत वेलकम ग्रँड.. 🎉🤝
तूच भरली बघ..आनंदाने इच्छांची टोकरी 🧺😊
स्वप्नांना पंख देणारी...तूच लाख मोलाची नोकरी.. ✨🕊️💼
तुझ्याच मुळे आज करतोय सारी मौज आणि मस्ती 🥳🎶
खर्च करताना कुठेच वाटत नाही धास्ती... 💳😄
काल पर्यंत रेल्वे च्या जनरल बोगीने धक्के खाणारा 🚃😖
आज करतोय देशी विदेशी विमान वारी.. ✈️🌍
तुझ्याच मुळे बघ मुलबाळांच्या..नि परिवाराच्या चेहर्या वर हसू आणि आनंद पाहून..मज्जा येते न्यारी.. 👨👩👧👦😊❤️
तुझ्याच कृपेने झालोय आज..सन्मान आणि प्रतिष्ठेचा मानकरी 🏅🙏
स्वप्नांना पंख देणारी...तूच लाख मोलाची नोकरी.. ✨🕊️💼
तूच शिकवले बघ...माणसं ओळखायला... 🧠👥
प्रशंसा आणि टीका दोघींना शांत डोक्याने हाताळायला.. ⚖️😌
तूच मिळवून दिलेस बघ जीवाभावाचे मित्र... 🤝❤️
सुख दुःख सगळा तुझ्याच भवती...चालवतेस तूच रोमांचक आयुष्याचे चलचित्र.. 🎥🎢
सुख सोयींनी भरलेला तुझा आवास.. 🏡✨
लहानपणी वडा पाव घ्यायला घाबरणारा मी..आज तुझ्याच मुळे घेतोय पंचतारांकित हॉटेलमध्ये पदार्थाचं सुवास.. 🍔➡️🍽️⭐
तुझी महिमा गातांना.. विणतो बघ आठवणींच्या लोकरी.. 🧶🎶
स्वप्नांना पंख देणारी...तूच लाख मोलाची नोकरी.. ✨🕊️💼
तुला रोज जपणं..म्हणजे जीवाला घोर.. 😰💼
रोजच बळकट करायला लागते बघ मेहनतीची दोर.. 💪🪢
म्हणत असते रोज कुणी ना कुणी...सोडून दे तुझा ध्यास... 🗣️🤔
तुला मिळवण्या साठी केलेलं प्रयत्न आठवून...मन कुजबुजते..ह्याच साठी केला होता का हा अट्टाहास.. 💭🔥
आज न उदया तुझ्याशी संबंध हा तुटेलच. ⏳💔
जगाच्या नीती प्रमाणे...माझ्या नंतर कुणीतरी नातं नवीन जोडेलच.. 🌍🔄
तो पर्यंत बघ हा असाच आनंदी व्यवहार चालू दे.. 😊🤝
तुझ्या हातून येणाऱ्या लक्ष्मी सोबत..विद्येची 🪔💰
न्यानाच्या सरस्वतीचा ही आशीर्वाद मिळू दे.. 📚🙏✨